
सक्षम भारतीय वार्ता
नागपूर : श्री साई महिला जागर संस्था द्वारा संचालित श्री साई स्पोटिंग क्लब नागपूर यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित खास महिलांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत तिसरा दिवस व बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मा. श्रीमती. नीताताई राजेंद्रजी ठाकरे महापौर, मा. श्रीमती. राणीसाहेब यशोदराराजे भोसले, मा. श्रीमती. नीताताई दडवे अर्जुन अवार्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू, मा. श्रीमती. पल्लवीताई धात्रक जिल्हा क्रीडा अधिकारी, मा. श्रीमती. सविताताई मोहनजी मते, मा. श्रीमती. सारिकाताई विलासजी पाटील समाजसेवक, मा. श्रीमती. गीताताई साखरे जिल्हा क्रीडा अधिकारी, मा. श्री. मोहनजी मते आमदार दक्षिण नागपूर, मा. श्री. विलास जी पाटील समाजसेवक, यांची उपस्थिती लाभली स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या महिला कबड्डी संघांनी उत्साह पूर्ण सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यांमध्ये खेळाडूंनी दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेच्या शेवटी विजेत्या संघ प्रथम बक्षीस मराठा लॉन्सर्स क्रीडा मंडळ महाल नागपूर व उपविजेत्या संघ द्वितीय बक्षीस गजानन क्रीडा मंडळ नागपूर, तृतीय बक्षीस श्री साई स्पोटिंग क्लब नागपूर, चतुर्थ बक्षीस जिल्हा चंद्रपूर, बेस्ट रेडर – साक्षी त्रिवेदी मराठा नागपूर, बेस्ट कॅचर – सिमी मोरया मराठा नागपूर, अष्टपैलू खेळाडू – रश्मी इंगळे गजानन नागपूर, वुमन ऑफ द सिरीज – मंगला ढबाले गजानन नागपूर, या संघांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी सन्मानचिन्ह व बक्षीशे देऊन गौरविण्यात आले उपस्थित मान्यवरांनी महिलांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पुढे यावे तसेच अशा स्पर्धांमुळे महिलांना आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळते असे मत व्यक्त केले. नमूद स्पर्धेदरम्यान जागतिक महिला दिनानिमित्ताने कबड्डी क्षेत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्व खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नमूद स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्री साई स्पोर्टिंग क्लब चे सर्व खेळाडू तसेच सर्व पदाधिकारी संयोजक अल्का ठेंगरे, अनिता रेड्डी यांनी अथक परिश्रम घेतले..








