शिवशक्ती नगरात हनुमान जयंती निमित्ताने जुन्या परंपरेनुसार चुलीवरच्या महाप्रसादाचा भक्तांनी घेतला आस्वाद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सक्षम भारतीय वार्ता / देवराव प्रधान
नागपूर : मानेवाडा रिंग रोड दक्षिण नागपूर येथील शिवशक्ती नगर श्री हनुमान पंच कमिटीच्या वतीने शिवशक्ती नगर नं. २ व ३ येथील, मंदिराच्या परिसरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम हनुमंताच्या मूर्तीला आकर्षक पद्धतीने सजविले. सकाळी अभिषेक, पूजा आरती व भजन करून सर्वांना काल्याचे वाटप केले. त्यावेळी भक्तांनी जय श्रीराम… जय हनुमान.. म्हणत एकमुखाने अंजनी पुत्राचा जयजयकार केला. असे केसरीनंदन, पवनसुत, बजरंगबली, जगाचा पालन हार सर्व शक्तिशाली तो म्हणजे संकटमोचन हनुमान.. भक्तांनी हजारोच्या संख्येने सकाळपासून संध्याकाळपर्यंत दर्शनाचा लाभ घेतला. सायंकाळी ७ वाजता. महाआरती झाल्यानंतर वस्तीतील नागरिकांनी व हनुमंताच्या भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे सिलेंडरच्या टंचाईमुळे चुलीवरचा स्वयंपाक अतिशय सुंदर झाला. त्यावेळी विविध प्रकारचे व्यंजने तयार केले गेले त्यामध्ये सर्वात पहिले मसालाभात, मसालेदार रस्सांची वांग्याची भाजी, पोळ्या, कडी, सलाद आणि गोड शिरा या सर्वांचाच आस्वाद भक्तांनी आनंदाने घेतला. यावेळी सर्वाचे सहकार्य लाभले म्हणूनच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें