सार्वजनिक वापराची जागा बनली सार्वजनिक सांडपाणी व कचरा साठवणीची जागा 

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सक्षम भारतीय वार्ता
बहादुरा : बहादुरा नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र. १० मधील मानवशक्ती लेआउट परिसरातील सार्वजनिक जागा ठरत आहे लोकांची डोकेदुखी. मानवशक्ती लेआऊट धारकाने सार्वजनिक वापराची जागा सोडून २०१६ आली त्याला कुंपण तसेच गेट सुद्धा लावले त्याच ठिकाणी नगरपंचायत ने ही सर्वजणी वापराची जागा असल्याचे निर्देशित फलक लाऊन याकडे मात्र दुर्लक्ष केले ज्यामुळे ती जागा लोकांच्या वापरात न येता सांडपाणी जमा व कचऱ्याच्या विखड्याने साप,विंचवाचे घर बनलेले असून त्याचा जीवघेणा त्रास परिसरातील लोकांना सहन करावा लागत आहे.या बाबद नवनियुक्त नगरसेविका, नगर प्रशासनाला तक्रार दिली असता अद्यापही समस्या सोडविण्यात आलेली नाही.विशेष म्हणजे नगरपंचायत बहादुरा ने मागील वर्षी खाजगी प्लॉट वर सूचना फलक लावले होते की प्लॉट धारकाने प्लॉट वर भरण घरून स्वच्छता ठेवली जेणे करून परिसरातील लोकांना त्रास होणार नाही असे न केल्यास प्लॉट धारकांवर कारवाई केली जाईल असे सूचना फलक लावले पण या उलट नगरपंचायत अधिकारातील वापराच्या जागेवर भरण न भरता त्याला स्वच्छही ठेवला नाही ज्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे तर मग आता यांच्यावर कारवाई कोण व कश्या पद्धतीने करायची असा प्रश्न जनता उपस्थित करून सार्वजनिक वापराची जागा भरणं भरून व स्वच्छ करून लोकांच्या वापरात आणावी अशी मागणी परिसरातील जनता करिता आहे.

सदर सार्वजनिक वापराच्या जागेत भरण भरून जागा स्वच्छ व परिसरातील लोकांना वापरण्यायोग्य करण्याकरिता प्रस्ताव मीटिंग मध्ये मांडलेला आहे लवकरच ती सर्जनिक जागा सार्वजनिक वापरायोग्य करू
दुर्गा अमर पेलणे,नगरसेविका प्रभाग क्र.१०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें