न.प.बाहादुरा क्षेत्रात कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवा : आंबेडकरवादी संघर्ष समितीची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सक्षम भारतीय वार्ता/नागपूर
बाहादुरा : नगरपंचायत झाल्यापासून  दोन वर्षाचा काळ लोटून विकास कामांना गती मिळालेली आहे पण त्या विकास कामात अद्यापही आरोग्य व स्वच्छता समाविष्ट असल्याचे पहावयास मिळत नाही.

याचे उदाहरण असं की सध्या नगरपंचायत बहादुरा क्षेत्रात असणारी घंटागाडीची संख्या व त्यांची नियमितता.

आज क्षेत्राचा विचार केला असता क्षेत्रात जास्त प्रमाणात कचरा निघतो व कचराकुंडी मुक्त भारत संकल्पनेने कचराकुंड्या तर नाहीशा झाल्या पण कचऱ्याचे नियोजन मात्र शून्य दिसत आहे.

संपूर्ण लोक वस्तीचा विचार केला असता एका दिवसावर घंटागाडी परिसरात यायला हवी जेणेकरून नियमित निघणारा घरचा कचरा हा नियमित घंटागाडीद्वारे संकलित केला जाईल परंतु चित्र असे दिसत आहे की आजच्या परिस्थितीत घंटागाडी आठवड्यातून एकदा येत आहे त्यामुळे घरातील कचरा दीर्घकाळ साठवून न ठेवता तो कचरा रस्त्याच्या कडेला फेकण्याचा बराचसा प्रकार डोळ्यासमोर दिसतो आहे ज्याच्या दुर्गंधीने आरोग्यास धोका होण्याची शक्यता नकारली जाऊ शकत नाही तरी आपणास या पत्राद्वारे अशी विनंती आहे की कचरा संकलन करणारी घंटागाडी परिसरात नियमित या मग एक दिवस आड पाठवावे जेणेकरून स्वच्छ भारत मिशन साकार होईल या करीता आंबेडकरवादी संघर्ष समितीने नगरपंचायत बाहादूरा प्रशासकीय अधिकारी यांना दिले निवेदन.

Saksham Bharatiya
Author: Saksham Bharatiya

सक्षम भारतीय साप्ताहिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *