सक्षम भारतीय वार्ता/भंडारा
अड्याळ येथील समाज जागृती प्रतिष्ठान, भंडारा द्वारा संचालित स्व. हरिदास बदियानी स्मृती अभ्यासिका येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ माॅ साहेब यांची जयंती पार पडली.
कार्यक्रमानिमित्त आज दिनांक १२ जानेवारी २०२५ रोज रविवार ला आई जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस बबनराव मुरकुटे यांनी पुष्प हार अर्पण करून पूजन केले . युवा दिन उत्साह आणि जोशाने भरलेला होता. तरुणांमध्ये नवीन उमेद आणि ध्येयांची ज्योत पेटवण्यात आली, हा दिवस त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरला. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळाले. एकत्र येऊन समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याचा संकल्प करण्यात आला. त्याच बरोबर राजमाता जिजाऊ माॅ साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजाना कशाप्रकारे संस्कार दिले याबद्दल माहिती देण्यात आली. युवा दिवसाचे आयोजन अत्यंत प्रभावीपणे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून बबनरावजी मुरकुटे हे उपस्थित होते, व त्यांनी फोटोला माल्यार्पण केल. त्याचबरोबर अभ्यासिका सहप्रमुख निशांत शिवरकर, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच मोहित पराते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच सुयोग्य रोहणकर यांनी स्वामीजिंच्या व माॅ साहेबांच्या जिवना वर प्रकाश टाकले. तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते…. तसेच 19 एप्रिल 2024 रोजी या अभ्यासिकेचा उद्घाटन झाला होता तेव्हा पासुन 120 ते 140 विद्यार्थी व विद्यार्थीनी या अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत…
Author: Saksham Bharatiya
सक्षम भारतीय साप्ताहिक







