अर्धवट रस्ते पूर्ण करायला निधी नाही..! लोकांना त्रास पण नाही…!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सक्षम भारतीय वार्ता
नागपूर/बहादूरा : ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीत झाल्याने बहादूरा परिसरात झपाट्याने विकास कामाला गती मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
विकास कामात प्रामुख्याने नाल्या, गडर लाईन, अभावी सिमेंट रस्ते मोठे लाईट व त्याच लाईटच्या खांबांना सध्याच्या स्थितीत बंद पडलेली शोभिवंत लाईट या मग ग्रीन जिम अशा प्रकारचे कामाची दखल नगरपंचायत बहादूरा क्षेत्रात घेण्यात आली त्या पलीकडे काही नाही.

त्या पलीकडचा विचार जर केला तर ते म्हणजे अपूर्ण रस्ते ज्यांची विशेषता अशी की त्या रस्त्याच्या नवीनीकरण कामाला सुरुवात तर झाली परंतु दीर्घ कालावधी लोटून सुद्धा रस्ता पूर्ण झालेला नाही. त्याचे मोठे कारण म्हणजे निधी, पैशाचा अभाव. तर मग प्रश्न हा पडतोय की जर नगरपंचायतीकडे मुबलक पैसा नाही या मग विशिष्ट त्या कार्या करिताबपैसा नाही तरीसुद्धा नगरपंचायतीकडून त्या कार्याची निविदा कशी काय काढण्यात आली ..?

जर कायद्याच्या तरतुदीनुसार त्या परिस्थितीमध्ये सुद्धा निविदा काढता येत असावी तर मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो आहे की निविदानुसार ज्याही कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आला त्यात असे नमूद केले असावे का की उपलब्ध निधी च्या अनुषंगाने कार्याचा मोबदला प्रधान करण्यात येईल…! या मग जितका मोबदला दिला जाईल तितकेच कार्य संपन्न करावे…! या मग आपण कार्य सुरू करा जर पैसा मोबदला उपलब्ध झाला नाही तर कार्य अर्धवट सोडू शकता…! या मग असं नमूद केलं असावं का की निर्धारित वेळेमध्ये रस्त्याचे कार्य पूर्ण करणे हे कंत्राटदारास बंधनकारक राहील…!

असे वरीलपैकी काही नमूद केले असतानाही काय कंत्राटदार आपल्या मनमरजीप्रमाणे वाटेल तेव्हा कार्य सुरू करून ते कार्य अर्ध्यातच अर्धवट लोकांना त्रास होईल अशा परिस्थितीतही अपूर्ण कार्य सोडू शकतो काय..! असे खूप सारे प्रश्न सामान्य जनतेच्या मनात भेडसावत आहेत आता तर असं वाटत आहे की जोपर्यंत त्या अर्धवट बनलेल्या रस्त्यावर काही जीवितहानी या मग लोकांचे मोठे आंदोलन होणार नाही तोपर्यंत नगरपंचायत बहादूरा प्रशासनाचे डोळे उघडणार नाही.

Saksham Bharatiya
Author: Saksham Bharatiya

सक्षम भारतीय साप्ताहिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें