पंकज वानखेडे यांना श्री संत चोखामेळा गौरव पुरस्काराने सन्मानित

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सक्षम भारतीय वार्ता/भंडारा 
पवनी येथे श्री संत चोखामेळा शिक्षण संस्था देवरी तसेच सामाजिक समरसता मंच भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने गत चार वर्षांपासून श्री संत चोखामेळा गौरव पुरस्कार सोहळा घेण्यात येतो. संत चोखामेळा गौरव पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या विभूतींचा गौरव या सोहळ्यात करण्यात येतो. या वर्षी हा कार्यक्रम बुधवार, ०८ जानेवारी २०२५ ला सायंकाळी ५ : ०० वाजता संघ भूमी , विदर्भाची काशी पवनी येथे अड्याळ येथील रहिवासी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज दिलीपराव वानखेडे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ,श्री संत चोखामेळा यांची प्रतिमा तसेच तुळस वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विश्वस्त विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर ह.भ.प .प्रकाश महाराज जवंजाळ जिल्हा बुलढाणा , सहसंयोजक रवी किरकोळे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती युवराज वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच ज्ञानेश्वरजी मेंढे अध्यक्ष श्री संत चोखामेळा शिक्षण संस्था पवनी गणेश जी ढोके जिल्हा समरसता संयोजक व अध्यक्ष सामाजिक समरसता मंच भंडारा उपस्थित होते.

तसेच कार्यक्रमाच्या संचलन उल्हास जी इटणकर विदर्भ प्रांत बौद्धिक प्रमुख तथा सहाय्यक शिक्षक रामटेक , व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एडवोकेट राहुल बावणे सामाजिक समरसता मंच पवनी तथा संयोजक यांनी केले. पंकज वानखेडे यांना सन्मानित केल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डी .टी. आंबेगावे तसेच सरचिटणीस संजीव भांबोरे तसेच संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाप्रसंगी राजकुमार वंजारी , प्रमोद निनावे, प्रज्वल शिवरकर, भुपेश दोडके , रवि विनकने , संजय वंजारी, अमित रामटेके , निखिल शेंडे उपस्थित होते.

Saksham Bharatiya
Author: Saksham Bharatiya

सक्षम भारतीय साप्ताहिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें