रेड स्वस्तिक सोसायटीचा 12 जानेवारीला 24 व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रसिद्ध सिने कलावंत सयाजी शिंदे सह अनेक मान्यवरांची उपस्थिती

सक्षम भारतीय वार्ता 11 जाने.2025
नागपूर : स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे मांगल्याचे पवित्र प्रतीक घेऊन २००१ वर्षी रेड स्वस्तिक सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. सदर संस्था पौरार्त्य संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करते. गेल्या 24 वर्षांपासून मानवतावादी आरोग्य सेवेत कार्यरत असुन आता पर्यंत सुमारे 95 लक्ष गरजवंतांना आरोग्य सेवा मिळवून देणाऱ्या ह्या रेड स्वस्तिक सोसायटीचा 24 वा वर्धापन दिन उद्या नागपूर येथील अर्जुना सेलिब्रेशन सभागृह, व्यंकटेश नगर, खामला, नागपूर येथे आयोजित करण्यात आला असून यासाठी प्रसिद्ध सिने अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.

१२ जानेवारी स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंती दिनी तसेच राष्ट्रीय युवक दिनानिमित्त सकाळी नऊ वाजता अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांच्या हस्ते या वर्धापन सोहळ्याची सुरुवात होणार असून दुपारी तीन वाजता दुसऱ्या सत्रामध्ये श्री. मिलिंद वाडकर, प्रमुख सुडकेमी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, श्री. क्रांतीकुमार महाजन, मुख्य समन्वयक अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलन, श्री. जय नारायण, झोनल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया, नागपूर, श्री. संजय अग्रवाल, सह आयुक्त, आयकर विभाग, नागपूर या मान्यवरांच्या उपस्थितीत देशभरातील सेवाभावी कार्यकर्त्यांचा सन्मान व सारथी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

तरी या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा व प्रतिष्ठा वाढवावी असे आवाहन रेड स्वस्तिक सोसायटी नागपूरचे मुख्य सल्लागार अर्जुन घुगल, जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद नाईक, कार्याध्यक्ष सुरेंद्र मनपिया, मोहन देशमुख, किसन बेरिया, विजय तपाडकर, जगन्नाथ गराट, सतीश घटाटे, पांडुरंग सोनवणे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

दिनांक – १२ जानेवारी २०२५, वेळ – ३.०० वा.

स्थळ- अर्जुना सेलीब्रेशन, खामला, नागपूर.

Saksham Bharatiya
Author: Saksham Bharatiya

सक्षम भारतीय साप्ताहिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें