सक्षम भारतीय वार्ता
डोंगरगाव : प्रियदर्शनी विद्यालय डोंगरगाव यांच्या सभागृहामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तितुर उपकेंद्र डोंगरगाव च्या वतीने संकेत शंभरकर यांच्या संकल्पनेतून कुष्ठरोगमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये कुष्ठरोगाबाबत रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले,त्याच बरोबर मुलांची गावातून प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री नागपुरे सर (मुख्याध्यापक), कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे डॉ. श्याम खोब्रागडे (वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र तितूर), प्रमुख उपस्थिती श्री विलासभाऊ चंदनखेडे (संचालक प्रियदर्शनी हाईस्कूल), डॉ. देशभ्रतार(वै. अधिकारी डोंगरगांव), श्री सुमेध भारशंकर (क्षयरोग पर्यवेक्षक), सितारामजी राठोड(आरोग्य निरिक्षक ता. आ.अ. कार्यालय कुही) माजी उपसरपंच श्री मोतीरामजी केदार, डॉ. मेघा कांबळे ( सा. आ. अधिकारी) श्रीमती मीरा बोरकर (आरोग्य सेविका), आशा स्वयंसेविका सौ प्रमीला चंदनखेडे, अंशकालिन परीचर सौ. लता केकतपुरे तसेच शाळेतील समस्त शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम अतिशय चांगल्या पध्दतीने पार पाडण्यात आला.








