जेष्ठ नागरिकांसाठी निःशुल्क योग, निसर्गोपचार आणि फिजिओथेरपी कॅम्पला प्रचंड प्रतिसाद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सक्षम भारतीय वार्ता
नागपूर : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स आणि जय तुळजाई ग्रामीण बहूउद्देशीय स्वयंसेवी संस्था, उमरसरा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिकांसाठी निःशुल्क योग, निसर्गोपचार आणि फिजिओथेरपी कॅम्प प्रचंड प्रमाणात उत्साहात संम्पन्न झाला. डॉ. श्रद्धा प्रशांत अनवाणे, डाएट, योग, निसर्गोपचार तज्ञ् कॅम्प यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. व कार्यक्रमाचे आयोजन आकार मल्टिपरपज फॉउंडेशन नागपूरच्या अनिता मसराम (9881703300) यांनी केले. राम मंदिर रामनगर चे अध्यक्ष कार्यक्रमाचे मुख्य अतिथी रवी वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते. 13 फेब्रुवारीला राममंदिर, रामनगरमध्ये वरिष्ठ नागरिकांनी भरभरून लाभ घेतला. या कार्यक्रमात पहिले स्वागत, नंतर उपस्थितांनसाठी मधुमेह, रक्तदाब व इतर व्याधीनंवर निसर्गोपचार व त्याकरिता काय पोषक आहार घ्यावा. यावर प्रात्यक्षिकासह, तज्ञाचे मार्गदर्शन आणि कार्यक्रमाचा सरते शेवटी संगीतमय फिजिओनृत्य सादर करून झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें