सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

कळमेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती

सक्षम भारत वार्ता
कळमेश्वर /ब्राह्मणी ता.20 :कळमेश्वर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळाची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याबाबतचा निर्णय 22 ऑक्टोबर पर्यंत घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले होते या संदर्भात बाजार समितीने सादर केलेला प्रस्ताव कायद्यानुसार निर्णय घ्यावा व संबंधित प्रभावित पक्ष्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी द्यावी असे न्यायालयाने स्पष्ट केले असे न्यायालयाने स्पष्ट केले या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किल्लोर, न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या समक्ष सुनावणी झाली परंतु आज दिनांक १९ ऑक्टोंबर रोजी दुपारी ४ वाजता शासनाने तडका फडकी निर्णय घेऊन कळमेश्वर बाजार समितीवर कळमेश्वर चे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मिलिंद भालेराव यांना विद्यमान संचालक मंडळ पदमुक्त करून बाजार समितीच्या प्रशासकपदी निवडणूक पर्यंत समोरील सहा महिने नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले राज्यात असलेल्या दुष्काळजन्य परिस्थिती त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची होत असलेले हाल व बाजारभाव इत्यादी बाबी लक्षात घेऊन बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देणे आवश्यक असताना राजकीय खेळातून सदर बाजार समितीवर प्रशासक नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जाते सदर बाजार समिती सभापती बाबा पाटील व संचालक मंडळ यांनी बाजार समिती उत्कृष्टपणे चालवली असून सदर बाजार समिती नफ्यात असल्याचे बोलले जाते.

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More