राज्यस्तरिय महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनीचा थाटात शुभारंभ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

समक्ष भारतीय वार्ता
नागपूर,११ :  ग्रामीण भागातील महिलांना उमेद अभियानाच्या माध्यमातून शैक्षणिक आर्थिक सक्षम करण्याचा मानस शासनाचा आहे. अभियानातील सर्व समूहातील सहभागी महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना लखपती दीदी बनविण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गावागावात महिलांना विविध रोजगारभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांचे उद्योग उभारून त्यांना त्यांची शाश्वत उपजीविका उभारून दिली जात आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील महिला लखपती दीदी कशा होतील याच्यावर सक्रियतेने काम सुरू असल्याचे मत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी व्यक्त केले,

महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायतराज विभाग, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनीचे आयोजन रेशीमबाग मैदान नागपूर येथे दिनांक १० ते २३ मार्च पर्यंत करण्यात आले आहे.

महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभा प्रसंगी नागपूर महानगरपालीकेच्या महापौर नीता ठाकरे, समाज सेविका श्रीमती कांचनताई गडकरी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, नागपूर विभाग नागपूर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, विशेष आकर्षण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, उमेद अभियानाचे मुख्य परिचलन अधिकारी, निखिल ओसवाल, अपर आयुक्त आस्थापना विवेक इलमे, अपर आयुक्त विकास वर्षा गौरकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, प्रकल्प संचालक अंशूजा गराटे, उपसंचालक संदीप जठार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुपील कलोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी कुमुदिनी हाडोळे कार्यकारी अभियंता कल्पना इखार, वैशाली ठाकूर, आमदार मोहन मते यांच्या पत्नी सविता मते आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

महिलांच्या कलागुणांना वाव अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळत आहे. ग्रामीण भागातील महिलांना ही संधी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली यामुळे त्यांना देखील त्यांच्या व्यवसायात वाढ करण्यास मोठी मदत होईल, मोदी साहेबांच्या लखपती दीदी धोरणाची खरी अंमलबजावणी या अभियानाच्या माध्यमातून होत आहे आणि यशस्वी होत आहे हे कौतुकास्पद आहे असे मत समाजसेविका कांचन गडकरी यांनी व्यक्त केले.

ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी महालक्ष्मी सरस महोत्सवाचे नागपूर मध्ये आयोजन केले याचा आम्हाला अभिमान वाटतोय, महिलांमध्ये मातृत्वाची भावना अतिशय प्रगल्भ असते त्यामुळे महिला संकट काळात देखील सक्षम पणे उभे राहतात असे मत नीता ठाकरे महापौर महानगरपालिका नागपूर यांनी व्यक्त केले.

नागपूरकराना आवाहन आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी महालक्ष्मी सरस ला भेट द्यावी. सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा आणि ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनाची सुद्धा खरेदी करावी करून त्यांच्या आर्थिक विकासाला हातभार लावावा असे आवाहन विजयालक्ष्मी बिदरी विभागीय आयुक्त नागपूर यांनी केले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेच्या माध्यमातून लखपती दीदी बनवण्याचं काम राज्यामध्ये गतिशील पद्धतीने सुरू आहे आणि तब्बल मागील वर्षभरात 24 लाख महिला लखपती दीदी झाले आहेत, नागपूर जिल्ह्यात 97 हजार महिला लखपती दीदी झाल्या आहेत आणि याचा मोठा फायदा त्या महिलांना होत आहे..

महिलांच्या प्रगतीचा जो उचांक गाठलेला दिसतो तो त्यांचा आर्थिक विकासाचा दिसतो. कोरोना काळात ज्या वेळेस सर्व उद्योग बंद होते त्यावेळी महिलांनी मास निर्मिती करून आरोग्य विभागाला मोठे सहकार्य केले हेच खरं यश महिलांचे आहे या शब्दात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी कौतुक केले.

सर्व महिला हिरकणी, जिजाऊ आणि पृथ्वीतलावरच्या खऱ्या अप्सरा माझ्या बचत समूहातील महिला आहेत.. कलाकार म्हणून, एक स्त्री म्हणून माझ्याकडून समाजासाठी जे काही देणे लागत त्यासाठी मी प्रयत्न करते.. महालक्ष्मी सरस सारखे बाजारपेठेचे मोठे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिले हेच उमेद अभियानाचं यश असल्याचे मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले
शुभारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी करतांना प्रदर्शनीच्या मागील भूमिका विषद केलेी ते म्हणाले नागपूर जिल्हयातील ग्रामिण भागातील महिला लखपती दिदी होण्यासाठी जिल्हा परिषद सदैव प्रयत्न करेल, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ कलमकिशोर फुटाणे यांनी केले तर तर सूत्रसंचालन शिप्रा मानकर यांनी केले.फेटे घालून असलेल्या बचत गटांच्या महिलांनी परिसर गजबजून गेला होता. एका वेगळया आकांक्षाने मोठया प्रमाणात असलेली महिलांची उपस्थीती कार्यक्रमाला होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें