सक्षम भारतीय वार्ता
बेसा–पिपळा, दि.16 : नगरपंचायत च्या वतीने दिनांक १५ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला “हॅपी स्ट्रीट” हा उपक्रम मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. या कार्यक्रमामध्ये सकाळी व्यायाम, झुंबा, डान्स, योगा, विविध खेळ आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे नागपूरचे प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्स शशांक उदाखे,वैभव सोनवणे, नेहा ठोंबरे आणि अक्षय ढोबळे यांची उपस्थिती होती त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमात अधिक उत्साह निर्माण झाला आणि युवकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले.कार्यक्रमा मधे प्रामुख्याने किर्ती बडोले,नगराध्यक्ष,उपाध्यक्ष नरेश भोयर,बांधकाम सभापती मुकेश भाऊ काळे, महिला व बालकल्याण सभापती विद्याताई भोयर. महिला व बालकल्याण उपसभापती मनीषाताई राजुरकर, नगरसेविका वैशालीताई ढोणे ,वैशालीताई भोयर वैशालीताई वानखेडे, कल्पनाताई सुके, गंगा गोल्हार. तसेच बेसा–पिपळा नगरपंचायतीतील सर्व नगरसेवक व नगरसेविका व सर्व नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
बेसा–पिपळा परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य, फिटनेस आणि सामाजिक एकोपा वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम मुख्याधिकारी भरत नंदनवार यांच्या नियंत्रणात अत्यंत यशस्वी ठरला असून नागरिकांकडून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले.









