युगांडाच्या प्रवाशामुळे यंत्रणा अलर्ट इबोलाची जोखीम

सक्षम भारत वार्ता
नागपुर ता.२८ : आफ्रिकन देशांमध्ये ‘इबोला’ च्या या नव्या विषाणूचे थैमान पसरले असताना युगांडातून नागपुरात डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतलेल्या ४७ वर्षीय प्रवाशाला महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रशासनाने गृह विलगीकरणात राहण्याची विनंती केली. त्याच्यावर महापालिकेच्या डॉक्टरांची २१ दिवस नजर राहणार आहे. इबोलाची जोखीम बघता महापालिका प्रशासन हायअलर्ट मोडवर आहे. मेडिकलमध्ये खाटा आरक्षित ठेवल्या आहेत,नागपुरात आलेला हा प्रवासी युगांडात इबोलाबाधिताच्या संपर्कात आलेला नाही. त्याला कोणतीही इबोलाचे लक्षणे नाहीत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून मनपाच्या आरोग्य विभागाने गृहविलगीकरणाचा पर्याय दिला. संबधित नागरिक युगांडात राहात होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर एअरपोर्ट हेल्थ अथॉरटीच्या अधिकाऱ्यांनी त्याची प्राथमिक तपासणी केली. इबोलाची लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र, इबोला विषाणूचा ‘इन्क्युबेशन पिरीयड’ (लक्षणे दिसण्याचा कालावधी) लक्षात घेता, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील २१ दिवस गृहविलगीकरणाचे
“मेडिकलमध्ये आयसोलेशन वॉर्ड: डॉ. गावंडे”
मेडिकल प्रशासनाने भविष्यातील जोखीम लक्षात घेता, ‘इबोला बाधित किंवा संशयित रुग्णांवर उपचारासाठी मेडिकलमध्ये एक स्वतंत्र विशेष कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) तयार केला आहे. यात चार खाटांची सोय करण्यात आली असून भविष्यात रुग्णांमध्ये वाढ झाल्यास खाटांची संख्याही वाढवण्यात येईल. रुग्णांसाठी आवश्यक जीवनरक्षक औषधे आणि यंत्र सामुग्रीची सोय तसेच डॉक्टरांसाठी पीपीटी कीटची व्यवस्था केली आहे, असे मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले.












