सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

MSBTE च्या आउट ऑफ सिलेबस प्रश्नाला बोनस गुण देण्याची विद्यार्थ्यांची मागणी

शिवसेना ओबीसी विभागातर्फे प्रवीण कळंबे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर काण्यात आले

सक्षम भारत वार्ता
नागपूर : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) अंतर्गत दि. ४ मे २०२६ रोजी, घेण्यात आलेल्या K Scheme अंतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सहाव्या सत्रातील Maintenance and Repair Structure या विषयाच्या परीक्षेमध्ये आउट ऑफ सिलेबस प्रश्न विचारण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. संबंधित प्रश्नासाठी ४ बोनस गुण देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी शासन आणि तंत्रशिक्षण विभागाकडे केली आहे. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एखनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह संबंधित विभागांना निवेदन सादर केले आहे. निवेदनानुसार, प्रश्न क्रमांक ३ (D) हा अभ्यासक्रमा बाहेरील असल्याचे सांगण्यात आले आहे. हा प्रश्न ४ गुणांचा असून “Procedure” हा विषय अधिकृत अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट नसल्याचा दावा करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्या नुसार, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध अभ्यासक्रमात देखील या विषयाचा कोणताही उल्लेख नाही. विद्यार्थ्यांनी यामुळे परीक्षार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,यासाठी संबंधित प्रश्नाचे ४ बोनस गुण सर्व विद्यार्थ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे. तसेच भविष्यात प्रश्न पत्रिका तयार करतांना अभ्यासक्रमाचे काटेकोर पालन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याप्रसंगी निवेदन सादर करतांना प्रविण कळंबे- पूर्व विदर्भ अध्यक्ष- शिवसेना ओबीसी विभाग, रोशन उरकुडे- भंडारा जिल्हा समन्वयक, भारती जांभुळकर, अभिविलाश नखाते, धनंजय बिरणवार, दयाराम आकरे, सुभाष पा़ल, चौधरी सर, प्रभाकर तळस, प्रशांत घांघरे, सचिन काळबांडे, अमोल, तादुंळकर, विक्रांत चाफले, शरद ठाकरे, दिपक नागपूरे, महेश मलेवार, अतुल ठोंबरे अभिजित बाहे, ऋषभ काळबांडे संजय घोंगडे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Read More