सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

डॉ. भुवनेश्वरी मेहरे यांची डॉ .आंबेडकर कॉलेजच्या प्राचार्यपदी नियुक्ती

सक्षम भारत वार्ता
नागपूर : सोमवार दिनांक ६ जुलै २०२६ रोजी, झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या मीटिंगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या नियमित पदावर डॉ. भुवनेश्वर मेहरे यांची विद्यापीठ कायदा, विद्यापीठ अध्यादेश क्रमांक २४ मधील तरतुदीनुसार पुनर्स्थापित करण्यात आली. समितीच्या मीटिंगमध्ये अध्यक्ष विलास गजघाटे, डॉ. राजेंद्र गवई, डॉ. कमलताई गवई, एन.आर.सुटे, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ.डी.जी दाभाडे आणि भदंत नागदीपंकर हे उपस्थित होते.

डॉ. भुवनेश्वरी मेहरे यांची विद्यापीठाच्या निवड समितीने १ जानेवारी २०२२ रोजी निवड केली होती. त्यानुसार त्या १३ एप्रिल २०२२ रोजी डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून रुजू झाल्या होत्या. परंतु त्यांना समितीच्या माजी अध्यक्षांनी डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्या मीटिंगमध्ये कोणताही निर्णय न घेता तसेच कोणतीही चौकशी न करता, बेकायदेशीरपणे त्यांना पदानवत केले होते. विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठाची एप्रिल २०२७ पर्यंत प्राचार्य म्हणून मान्यता आहे.

Leave a Comment

Read More