सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

जुन्या पेन्शनसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचे शाळाबंद आंदोलन शांततेत पार

सक्षम भारत वार्ता
नागपूर | प्रतिनिधी (SBTV)
नागपूर ता.९ : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वाखाली आज (९ जुलै) नागपूर येथे शिक्षकांनी शाळाबंद आंदोलन करून शासनाचे लक्ष विविध प्रलंबित मागण्यांकडे वेधले. संविधान चौक येथे दुपारी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित राहिले. आंदोलकांनी जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी, टीईटी पात्र अपात्र वाद, पदोन्नती, सरसकट पदवीधर वेतनश्रेणी तसेच SIR/BLO कामामुळे शिक्षण व्यवस्थेवर होणारा परिणाम यांसारख्या मागण्यांवर जोरदार घोषणाबाजी केली.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलनानंतर शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Read More