बहादुरात बैलपोळ्याचा जल्लोष; ढोल-ताशांच्या गजरात बैलजोड्यांची मिरवणूक
सक्षम भारत वार्ता
बहादुरा,ता.१० : बहादुरा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील शेतकरी बांधवांनी आपल्या बैलजोड्यांना पारंपरिक साहित्य व आकर्षक सजावट करून पोळ्याच्या तोरणात आणले. ढोल-ताशांच्या गजरात बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी सभापती नरेंद्र नांदुरकर यांच्या हस्ते प्रत्येक बैलजोडीची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच शेतकरी बांधवांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. बैलपोळ्याच्या पारंपरिक सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सक्करदरा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या सहकार्याबद्दल त्यांचेही स्वागत करण्यात आले.यावेळी सभापती नरेंद्र नांदुरकर, सुनील खंदाडे, अतुल आंबटकर, बाबा बोकडे, तुळशीराम खंदाडे, अजय खंदाडे, बालू लांडगे, राहुल गायधणे, राम कावडकर,वसंता लांडगे, राजेश माकडे,यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, महिला व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार

















