सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

शासकीय तंत्रनिकेतन व दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स तर्फे राष्ट्रीय हातमाग दिवस संपन्न

सक्षम भारत वार्ता
नागपूर, १० सप्टेंबर : राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्ताने नुकत्याच झालेल्या २ सप्टेंबर रोजी, शासकीय तंत्रनिकेतन (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक), नागपूर आणि दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), नागपूर लोकल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात संपन्न झाला. आपल्या देशाच्या समृद्ध हातमाग वारसाचे जतन करणाऱ्या व कुशल विणकरांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हातमाग हा भारताच्या सांस्कृतिक ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे, ज्याचा इतिहास ७,००० वर्षांपेक्षा जास्त आहे. ही प्राचीन कलाकुसर पिढ्यानपिढ्या जपत, प्रत्येक टप्प्यावर तिचे अन्य तंत्र, डिझाइन व आकृतिबंध विकसित झाले आहेत. याप्रसंगी शासकीय तंत्रनिकेतन नागपूरच्या कापड उत्पादक विभागातर्फे वृक्षारोपण कार्यक्रमासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आशिष पी. मोडक (विभागीय संचालक, KVIC विदर्भ विभाग) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नरेश उगेमुगे (वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, माविम), डॉ. सी.पी.कापसे (विभागप्रमुख, कापड उत्पादन विभाग), डॉ.संदीप शिर्खेडकर (अध्यक्ष, दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, नागपूर लोकल सेंटर), जयंत जोशी ( सचिव, दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, नागपूर लोकल सेंटर) आणि डॉ. अविनाश वैद्य (संयोजक / Convener, दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स) यांची प्रमुख उपस्थिती होती. आजच्या आधुनिक युगात ‘एअर जेट स्पिनिंग सिस्टीम’ सारख्या हाय- स्पीड तंत्रज्ञानामुळे दिवसाला ३०० मीटर कापड उत्पादन होत असतानाही, दिवसाला केवळ ६ मीटर उत्पादन देणाऱ्या पारंपरिक हातमागाचे मोल आजही तितकेच अनिवार्य आहे. ऑटोमेटेड मशिनरी वापरून तयार केलेल्या कपड्यांची तुलना हाताने विणकाम करणाऱ्या कष्टकरी विणकरांच्या कौशल्याशी होऊ शकत नाही. हातमागामुळे आज देशातील ग्रामीण भागात ४.३ दशलक्ष लोकांना रोजगार मिळतो. भारत २,५०० पेक्षा जास्त प्रकारांच्या हातमाग कापडाचे उत्पादन करतो. हातमाग हे शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल कापड उत्पादनाला चालना देते. भारतीय हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी, विणकरांना पाठिंबा देण्यासाठी आणि ही प्राचीन कलाकुसर जतन करण्यासाठी सर्वांनी हातमाग उत्पादने खरेदी करावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More