सक्षम भारत वार्ता
नागपुर,ता.१२ : श्रीहरीनगर मानेवाडा नागपूर येथील हनुमान मंदिर पंचकमिटीतर्फे तान्हापोळा साजरा करण्यात आला. नंदीपोळ्यामध्ये एकूण 360 स्पर्धकांनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून आपला सहभाग नोंदविला. यामध्ये प्रथम दहा विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तर सहा विजेत्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. प्राथम पारितोषिक लवांश बघेल, द्वितीय पारितोषिक दक्ष उमाटे, तृतीय पारितोषिक कुशाग्र उरकुडे, चतुर्थ पारितोषिक स्वराज भोले, पाचवे पारितोषिक अरुणा जैन, सहावे पारितोषिक प्रांसी हत्तीमारे ,सातवे पारितोषिक सावी बांदेकर, आठवे पारितोषिक राघव पराते, नववे पारितोषिक तेजल पांडे, दहावे पारितोषिक युवन महाजन याशिवाय अनिश रघुतेऺ, वियाम उमरकर, सन्नु येसखेडे, कुशाग्र उरकुडे, निहित वानखेडे, सावी कांबळे यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुरेशजी उरकुडे, डॉ.अशोक मंदे, विठ्ठलराव घोडे, केशवराव बोपुलकर, कवडू ईटणकर, रामदासजी कोल्हे, प्रवीण सुरकर, शिवराम गुरनुले, अशोक माहुरे, विजय लोणारे, राजेश होरे, छोटू जगनाडे, जानराव बारई, प्रतीक लांजेवार, नगरातील प्रतिष्ठित मंडळी व नागरिक उपस्थित होते
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार















