सक्षम भारत वार्ता
नागपुर,ता.१७ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत नागपूर विभागांतर्गत नागपूरमध्ये 25, वर्धा 10 भंडारा 9 गोंदिया 8, चंद्रपूर 11, गडचिरोली 7 अशा एकूण 70 शासकीय वसतिगृहांची शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने अधिकृतपणे सुरू झाली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज व इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहाचे सन 2026-27 या शैक्षणिक सत्रातील व्यावसाईक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करण्याची १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु सीईटी सेलचे व्यावसाईक अभ्यासक्रमाचे शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश देणे अद्यापही सुरु असून बहुतेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता आलेले नाही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पालक आणि विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ दिलेली असून आता 30 सप्टेंबर, 2026 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी नियोजित वेळेत https://hmasnew.mahait.org या पोर्टलद्वारे दिनांक 30.9.2026 पर्यंत अर्ज सादर करावे.
सुधारीत वेळापत्रकानुसार सन 2026-27 या शैक्षणिक सत्रासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वसतिगृह प्रवेशाचे अर्ज दि.30/9/2026 पर्यंत सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना शासकीय वसतिगृहात प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांनी लवकरात लवकर वर दिलेल्या लिंकवर नियोजित वेळेत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रसाद कुळकर्णी, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांनी केले आहे.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार
Views: 43
















