धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शताब्दी नगरातील एन.आय.टी. परिसरात कार्यक्रम; भदंत प्रियदर्शी महाथेरो यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण
सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता.१५ : गेल्या वीस वर्षांपासून पाहिलेले स्वप्न अखेर साकार झाले असून, शताब्दी नगर येथील एन.आय.टी. परिसरात ‘मानव कल्याण अभ्यासिके’चे उद्घाटन धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर उत्साहात करण्यात आले. या अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण उपलब्ध होण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात भदंत प्रियदर्शी महाथेरो यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत अभ्यासिकेची फीत कापून उद्घाटन करण्यात आले. वीस वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर साकारलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक महत्त्वाचे केंद्र उपलब्ध झाले आहे.
या कार्यक्रमाला बौद्ध विचारवंत राम घोडेस्वार, ऑल इंडिया समता सैनिक दलाचे हरेश्वर चव्हाणदे, माजी मुख्य अभियंता प्रकाश भोतमांगे, बुद्धिस्ट स्टडीजचे सुभाष बोंधाटे, बौद्ध उपासिका जोहार आई कांबळे, शाक्यसिंह संस्थेच्या स्मिता वासेकर, समता बुद्ध विहारचे दिलीप पाटील, अभियंता सुरेश खांडेकर तसेच राष्ट्रीय संरक्षक वासनिक यांची उपस्थिती होती.
मानव कल्याण संस्थेच्या सौ. संगीता म्हैस्कर यांच्यासह माला वाघमारे, उज्ज्वला डोंगरे, संध्या चौरे, माधुरी रामटेके, अपूर्वा वाळके, सुनीता पारखंडे, आनंद कोचे, वच्छला वाळके, शंकर पारखंडे, प्रशांत नाईक, मिलिंद रामटेके, कुणाल मोडक, रमेश डोंगरे, निकिता थुलकर, अपूर्वा नागदेवे, सरस्वती तेलमोरे, योगेश्री खांडेकर, आशा कोचे, भावना मुन, वैशाली नाईक, कविता रामटेके आणि हुमने ताई यांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वाचे पाऊल
वीस वर्षांच्या प्रयत्नांतून साकारलेली मानव कल्याण अभ्यासिका ही केवळ अभ्यासाची जागा नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारलेले एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर या अभ्यासिकेचे उद्घाटन झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार















