सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

माळी समाजाचा उपवर युवक-युवती परिचय मेळावा आता १५ नोव्हेंबरला

१५ नोव्हेंबरला गीता मंदिरात सकाळी १० वाजता आयोजन; समाजबांधवांनी नोंद घेण्याचे आयोजकांचे आवाहन

सक्षम भारत वार्ता
नागपूर,ता.२६ : माळी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा उपवर युवक- ‘युवती परिचय मेळावा आता रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी हा मेळावा रविवार, १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणार होता. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे कार्यक्रमाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. हा परिचय मेळावा गीता मंदिर, सुभाष रोड काटन मार्केट नागपूर येथे सकाळी १० वाजता होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून विवाह योग्य युवक – युवतींना एकमेकांची माहिती जाणून घेण्याची आणि विवाहासाठी योग्य स्थळ शोधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तरी माळी समाजातील सर्व समाजबांधवांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजक श्री. गोविंदराव वैराळे, मधुसूदन देशमुख आणि कैलास जामगडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९४२३१०९९४१

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More