सक्षम भारत वार्ता
नागपूर, दि. ३ सप्टेंबर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे कथित ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या निषेधार्थ नागपूर शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आज संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष भाऊराव कोकणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला. संबंधितांविरुद्ध अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. संविधान चौकातील या आंदोलनात रत्नदीप रंगारी, नरेश खडसे, दिनेश वाघमारे, प्रमोद शिगणे, विवेक निकोसे, रोहीत यादव, रोहित बीनक, राहुल आसेकर, सुरेश नारनवरे, राजेंद्र शेंडे, प्रकाश फुके, प्रफुल्ल भाजे, बंडू वैद्य, अनिल रामटेके, जितेंद्र तागडे, निलेश पाटील, अभय ढाकणे, प्रमोद खोब्रागडे, संजय गजभिये, योगीता मोडक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार















