सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाज मेळावा रविवारी

केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी यांच्या सौजन्याने ५०० गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता.२६ : केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या सौजन्याने त्यांच्या मातोश्री स्व. श्रीमती भानुताई गडकरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मागील १७ वर्षांपासून चर्मकार सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत आहे. यंदाही इयत्ता दहावी व बारावीमध्ये ६५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या नागपूर शहर व ग्रामीण भागातील सुमारे ५०० (पाचशे) विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा भव्य सत्कार व समाज मेळावा रविवारी २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता. शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात, महाल, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी १,५०० रुपये प्रोत्साहनपर बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी उपस्थित राहणार असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासह आमदार प्रवीण दटके, मोहन मते, नरेंद्र भोंडेकर, डॉ. परिणय फुके, महापौर सौ. निताताई ठाकरे, माजी आमदार संदीप जोशी, अनिल सोले, डॉ. उपेंद्र कोठेकर, दयाशंकर तिवारी, सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष सतीश डागोर, उपमहापौर सौ. लिलाताई हाथीबेड, नगरसेवक व शहर महामंत्री रितेश गावंडे, योगेश पाचपोर, भैय्यासाहेब बिघाणे, श्रीराम मांडस्कर व डॉ. राजेंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नागपूर शहर व ग्रामीण जिल्ह्यातील सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक तसेच समाज बांधव- भगिनींनी या सामाजिक व शैक्षणिक मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चर्मकार सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More