हुडकेश्वर पोलीसांची कारवाई ; सोन्याचे दागिने, रोकड, मोबाईल व दुचाकी जप्त.
सक्षम भारत वार्ता
बहादुरा, ता.23 : शहरात महिलांना एकटे बघून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच बॅग हिसकावून पसार होणाऱ्या आरोपींना हुडकेश्वर पोलिसांनी केले जेरबंद. पोलिसांनी केलेल्या तपासात लूटमार व चोरीचे चार गुन्हे उघडकीस आल्याची माहिती देण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता महालक्ष्मी नगर परिसरातील संतोषी माता मंदिराजवळ एका महिलेच्या हातातील पर्स दुचाकीवरून आलेल्या इसमाने हिसकावून नेली होती. या पर्समध्ये सुमारे दहा हजार रुपये रोख, मोबाइल, आधारकार्ड, पॅनकार्ड व पासबुक असा मुद्देमाल होता. तक्रार दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून आरोपींचा शोध घेतांना तपासादरम्यान मुख्य आरोपी म्हणून हर्ष ऊर्फ एक्का महेंद्र रामटेक (वय 25) याचे नाव समोर आले. तो तिरोडा, जि. गोंदिया येथील असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिस तपासात आरोपींनी नंदनवन, दिघोरी, सक्करदरा तसेच हुडकेश्वर परिसरात महिलांना लक्ष्य केल्याचे समोर आले. एका घटनेत महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन, मंगळसूत्र व सोन्याचा हार हिसकावून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले.
चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांपैकी काही दागिने गोल्ड लोन बँकेत गहाण ठेवून 4 लाख रुपये कर्ज घेतल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यातील काही रक्कम ऑनलाइन व्यवहारातून काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तसेच आरोपींनी चोरीची स्प्लेंडर आय-स्मार्ट दुचाकी वापरल्याचे तपासात समोर आले असून, नंदनवन परिसरातील वाहन चोरीचाही गुन्हा उघडकीस आला आहे. सदर आरोपी चोरीची गाडी घेऊन हुडकेश्वर बोगद्याजवळ असल्याची गुप्त आतामीदारा कडून माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापूरे यांच्या नेतृत्वात माहिती स्थळावर पोहचून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणात हुडकेश्वर, सक्करदरा आणि तुमसर पोलीस ठाण्यातील एकूण चार गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील साो. सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी साो., अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण विभाग वसंत परदेशी साो. मा. पो. उप. आयुक्त रश्मिता राव साो, झोन ०४, नागपूर शहर, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. नरेंद्र हिवरे सा, अजनी विभाग, नागपूर शहर, यांचे मार्गदर्शनात वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे पोलीस ठाणे हुडकेश्वर, नागपूर शहर सपोनि पपीन रामटेके, पो. हवा अविनाश श्रीरामे, पो. हवा बजरंग जुनघरे, पो हवा सतीश मानके, पो. हवा मुकेश कन्नाके, पोअं गौरव गजभिये ,यशवंत डोंगरे, ओमप्रकाश मते, नितेश कडु, ऋषभ ठाकरे सर्व नेमणूक पो. ठाणे. हुडकेश्वर, नागपूर शहर व पोअं हिंमाशु पाटील, अभिषेक पांडे सायबर विभाग परिमंडळ विभाग ०४ नागपुर शहर यांच्या सहकार्याने करण्यात आली.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार















