सक्षम भारत वार्ता
नागपूर,ता.१० : पारंपरिक वाद्ये आणि सांस्कृतिक उत्सवाच्या चौकटीत ऐवजी ध्वनीवर्धकांच्या वाढत्या स्पर्धने उत्सवाचे स्वरूप बदलले आहे निर्धारित मर्यादा पेक्षा अधिक तीव्र आवाज आणि कंपण, लेझर बीम लाइट यांच्या वापरामुळे धोका निर्माण होतो. डीजे च्या कर्कश आवाजामुळे नागरिकांच्या वृद्धांच्या छातीचे ठोके वाढतात, घबराहट होते, कानठळ्या बसतात त्यामुळे रुग्ण, लहान मुलं, यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. ध्वनी प्रदूषणामुळे सर्व सामान्यांना विशेषता ! हा आजारी व्यक्तींना मोठा त्रास होतो. ईद, जुलूस, संदल किंवा लग्न कार्यालयामध्ये डीजे आणि उच्च तीव्रतेचे ध्वनीक्षेपक वापरणे टाळावे. उत्सवाचा आनंद साजरा करतांना नागरिकांच्या आरोग्याकडे प्रथम लक्ष द्यायला पाहिजे. उत्सवाच्या नावाखाली चौका चौकात उभारल्या जाणाऱ्या ध्वनी वर्धकांच्या अजस्त्र भिंती आणि कानठळ्या बसविणाऱ्या डीजे च्या आवाजा विरोधात राज्यभरातील नागरिकांचा संताप तीव्र होत आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे आदेश निर्धारित डेसिबल मर्यादा आणि शांतता क्षेत्राचे नियम असतानाही होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कडक कानून बनवुन कायदे कायमची बंदी आणने अति आवश्यक आहे. राज्य डीजे मुक्त करण्यास सर्व नागरिकांनी मागणी तीव्र करावी. नागपुरातील सर्वच ज्येष्ठ नागरिक मंडळांनी या मागणीला पाठिंबा द्यावा.
श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ श्यामनगर तर्फे सचिव अशोक कातूरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार

















