सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

नागपूर विभागीय आयटीआय निदेशकांचा भव्य मेळावा रविवारी

सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता.30 : महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना, नागपूर विभागा च्यावतीने विभागीय मेळाव्याचे आयोजन रविवारी 31मे रोजी सकाळी 10 वाजता. श्रद्धानंद पेठ येथील मुंडले पब्लिक स्कूल परिसरात, शासकीय आयटीआय समोर करण्यात आले आहे. या मेळाव्यात नागपूर विभागातील सहा ही जिल्ह्यांतील आयटीआय निदेशक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. मेळाव्याचे उद्घाटन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून पदवीधर आमदार अभिजीत वंजारी यांदी उपस्थिती राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे माजी सरचिटणीस भोजराज काळे राहतील. तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहतील. नागपूर विभागात सध्या 78 शासकीय आयटीआय कार्यरत असून राज्यभरात शासनाच्या 419 आयटीआय संस्था सुरू आहेत. कौशल्य विकासाला राष्ट्रीय पातळीवर वाढते महत्त्व प्राप्त होत असताना आयटीआय संस्था या कुशल मनुष्यबळ निर्मितीच्या प्रमुख केंद्रांपैकी एक म्हणून उदयास आल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणी आणि कौशल्य विकासासाठी शासनाकडून होत असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर आयटीआय क्षेत्राचे महत्त्व अधिक अधोरेखित होत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

या मेळाव्यात आयटीआय शिक्षक व निदेशकांच्या विविध समस्या, प्रलंबित मागण्या, हक्क व जबाबदाऱ्या तसेच व्यवसाय शिक्षण विभागाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. संघटने च्यावतीने शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सातत्याने संचालनालय, मंत्रालय आणि शासन स्तरावर मांडले जात असून, त्यासंदर्भात पुढील दिशा ठरविण्याचे कामही या मेळाव्यात होणार आहे.

शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचे मार्गदर्शन आणि पदवीधर आमदार अभिजीत वंजारी यांचे संबोधन ऐकण्यासाठी निदेशकांमध्ये विशेष उत्सुकता असल्याचे संघटनेने सांगितले.

विभाग संपर्कप्रमुख तथा राज्य सहचिटणीस शिवाजी ढुमणे, राज्य सदस्य साहेबराव गूडधे, विभागीय अध्यक्ष प्रेमानंद भैसारे आणि जिल्हाध्यक्ष जयंत टालाटुले यांनी सर्व निदेशकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले जात आहे.

Leave a Comment

Read More