शेषनगरात श्री संत गजानन महाराजांच्या श्री विजय ग्रंथ पारायणाचे आयोजन रविवारी
सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता.030 : शेगावचे श्री संत गजानन महाराजांच्या कृपेने श्री विजय ग्रंथ पारायणाचे आयोजन रविवारी 31 मे रोजी करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सतगुरु कृपा हाऊसिंग सोसायटी, शेषनगर, मानेवाडा नागपूर येथे करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजका तर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7.30 वाजता पारायणाने होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत पारायण संपन्न होईल. त्यानंतर दुपारी 1.10 ते 1.30 वाजेपर्यंत आरती होईल. आरतीनंतर दुपारी 1.30 वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहेत. संत गजानन महाराजांच्या भक्तांसाठी हा आध्यात्मिक आणि भक्तीमय वातावरणाचा कार्यक्रम असून सर्व श्रद्धाळूंनी उपस्थित राहून श्रींचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत असे आवाहन आयोजकांनी केले आह












