सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

नागपुरातील क्वालीलॅब इंडस्ट्रीजला ब्रेथ अनालायझर पडताळणीचा परवाना

सक्षम भारत वार्ता
नागपूर, (दि. ९ जून) : नागपुरातील क्वालीलॅब इंडस्ट्रीज प्रा.लि. या संस्थेला भारत सरकारच्या लीगल मेट्रोलॉजी विभागाकडून ब्रेथ अनालायझर (Breath Analyzer) उपकरणांच्या पडताळणी व मुद्रांकनासाठी महाराष्ट्रातील अधिकृत परवाना प्रदान करण्यात आला आहे. शारदा नगर, हुडकेश्वर रोड नागपूर येथे कार्यरत असलेल्या संस्थेने NABL मान्यता व ISO/IEC 17025:2017 या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निकषांची पूर्तता करून ही मान्यता मिळविली आहे या परवान्यामुळे महाराष्ट्रातील पोलिस विभाग, वाहतूक संस्था, शासकीय विभाग व उद्योगांना राज्यातच अधिकृत आणि तांत्रिक दृष्ट्या प्रमाणित पडताळणी सेवा उपलब्ध होणार आहे. संस्थेचे प्रतिनिधी प्रवीण मांडे यांनी सांगितले की , या मान्यतेमुळे ब्रेथ अनालायझर उपकरणांच्या पडताळणीची प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ आणि पारदर्शक होणार असून वेळ व खर्चाची बचत होईल. ग्राहक संरक्षण, मापनातील अचूकता आणि ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ उपक्रमाला चालना देणारा हा निर्णय असल्याचे मानले जात आहे. अशी माहिती प्रवीण मांडे यांनी दिली आहे.

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More