सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

विद्यापीठात नेत्रदान दिन, नेत्र तपासणी शिबिर बुधवारी

सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता.९ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नेत्रदान दिन व नेत्र तपासणी शिबिर बुधवार, दि. १० जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अखिलेश पेशवे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांची उपस्थिती राहणार आहे.‌ या शिबिरामध्ये नेत्र तपासणी केली जाणार आहे. यावेळी नेत्रदान संकल्प देखील केले जाणार आहेत. नेत्रदान व नेत्र तपासणी शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे व विद्यापीठ प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद साळवे यांनी केले आहे.

Leave a Comment

Read More