सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

बहादुरा परिसरातील आशा सेविकांचे बी.एल.ओ. सहाय्यकाचे काम न करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सक्षम भारत वार्ता
बहादुरा, ता.13 : बहादुरा, गोन्ही सिम व खरबी परिसरातील सर्व आशा सेविकांनी बी.एल.ओ. (Booth Level Officer) सहाय्यक म्हणून नेमण्यात आलेल्या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी करत नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

निवेदनात आशा सेविकांनी म्हटले आहे की, आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असून त्यांना सध्या सुमारे ७८ प्रकारची विविध कामे पार पाडावी लागतात. गरोदर माता, नवजात बालके, बालकांचे लसीकरण, आरोग्य सर्वेक्षण, घरभेटी, जनजागृती तसेच विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी यांसह दिवसभर प्रत्यक्ष क्षेत्रात काम करावे लागते. याशिवाय रात्री ऑनलाइन माहिती भरणे व अहवाल सादर करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असते.

आशा सेविकांना कोणतीही नियमित सुट्टी नसून त्या २४ तास आरोग्य सेवेसाठी उपलब्ध राहतात. अशा परिस्थितीत बी.एल.ओ. सहाय्यकाची अतिरिक्त जबाबदारी पार पाडणे शक्य नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

त्यामुळे आरोग्य सेवेत पूर्णवेळ कार्य करता यावे आणि नागरिकांना अधिक प्रभावी आरोग्य सेवा देता यावी, यासाठी बी.एल.ओ. सहाय्यकाच्या जबाबदारीतून तात्काळ मुक्त करावे, अशी मागणी आशा सेविकांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.निवेदन देतांना सपना मुळे, चित्रा इंगोले, वर्षा लाखे, शुभांगी गायधने, रुक्मिणी पटले, लक्ष्मी धानोरकर, अश्विनी धांडे, योगिता वाकडे, सुशीला गुजरकर, संगीता मसाखेत्री, सरिता खांडेकर, दक्षिणा रामटेके, ज्योती पेटकर,सुनीता शंभरकर,पंचफुला मेंगरे उपस्थित होत्या. याबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Read More