सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

किराणा दुकानदाराला बनावट स्क्रिनशॉट दाखवून तेलाचा डब्बा घेऊन अज्ञात आरोपी पसार :  सक्करदरा पोलीस स्टेशनंला गुन्हा दाखल.

सक्षम भारत वार्ता
बहादुरा, ता.२५ : सक्करदरा पोलीस स्टेशनं अंतर्गत बहादुरा रोडवरील देशमुख ब्रदर्स मेघा मार्ट किराणा दुकानात ऑनलाईन पेमेंटच्या नावाखाली अज्ञात व्यक्तीने दुकानदाराची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने ₹2,560 किमतीचा तेलाचा डबा खरेदी करून क्यूआर कोडद्वारे पेमेंट केल्याचे भासवत बनावट स्क्रीनशॉट दाखवून माल घेऊन पोबारा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने दि 19 जुलै ला देशमुख किराणा दुकानातील तेलाचा डब्बा खरेदी करून क्यूआर कोडवरून पेमेंट करण्याचा प्रयत्न केला. पेमेंट होत नसल्याचे सांगून त्याने दुकानदाराचा मोबाईल नंबर मागितला आणि त्यावर व्यवहार झाल्याचे खोटे स्क्रीनशॉट दाखवले. घाईगडबडीत दुकानदाराने खात्यात रक्कम जमा झाल्याची खात्री न करता ग्राहकावर विश्वास ठेवून माल दिला.

काही वेळाने दुकानदाराने बँक खात्यात व मोबाईलवर व्यवहाराची पडताळणी केली असता कोणतीही रक्कम जमा झालेली नसल्याचे, फसवणूक लक्षात आले. त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संबंधित व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसून आला. मात्र, आरोपीचे नाव व पत्ता माहीत नसल्याने त्याचा शोध घेणे कठीण झाले.

या प्रकरणी देशमुख ब्रदर्स मेघा मार्ट च्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.

Leave a Comment

Read More