सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

PM मोदींच्या भाषणात बागेश्वर बाबांचा उल्लेख; नेमकं काय म्हणाले मोदी?

सक्षम भारत वार्ता
नवी दिल्ली, ता.8 : भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) दिल्लीच्या 57व्या पदवीदान सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षण, संशोधन, स्टार्टअप्स आणि भविष्यातील संधींबाबत मार्गदर्शन केले.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील ‘बाबा बागेश्वर’चा उल्लेख मात्र विशेष चर्चेचा विषय ठरला. विद्यार्थ्यांच्या मनात पदवी मिळाल्यानंतर पुढे काय करायचे, नोकरी, पगार, स्टार्टअप किंवा पुढील शिक्षण याबाबत अनेक विचार सुरू असतात, असा संदर्भ देताना मोदी म्हणाले, “मी बाबा बागेश्वर नाही, पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात काय चालले आहे, याचा अंदाज नक्कीच घेऊ शकतो,” अशा आशयाची मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात हशा पिकला.

यावेळी मोदी यांनी विद्यार्थ्यांना सतत शिकत राहण्याचे, जिज्ञासा जिवंत ठेवण्याचे आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःला सतत अपडेट करण्याचे आवाहन केले. तसेच देशाच्या विकासासाठी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

IIT दिल्लीच्या या सोहळ्यात ‘Param Pragya’ AI-powered supercomputing facilityचे उद्घाटनही करण्यात आले. संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याबाबतही पंतप्रधानांनी माहिती दिली.

बागेश्वर बाबांचा अनपेक्षित उल्लेख आणि त्यावर विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया यामुळे मोदींच्या भाषणातील हा प्रसंग सोशल मीडियावरही चर्चेत आला आहे.

Leave a Comment

Read More