सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

राज्य अन्न आयोगाच्या तीन दिवसीय नागपूर दौऱ्याला प्रारंभ

सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता.३० : राज्य अन्न आयोगाच्या तीन दिवसीय नागपूर दौऱ्याची गुरुवारी सुरुवात झाली. दौऱ्याच्या प्रारंभी राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे, सदस्य ईश्वर बाळबुधे तसेच अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची औपचारिक भेट घेतली. यावेळी सार्वजनिक वितरण प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत नागरी पुरवठा विभाग, महिला व बालविकास विभाग, शालेय पोषण आहार योजना, जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा बालरोगतज्ज्ञ अधिकारी, प्रकल्प अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत सार्वजनिक वितरण प्रणाली, अन्न सुरक्षा योजनांची अंमलबजावणी, भिकमुक्त शहर करणे व त्यांची सुधारगृहात व्यवस्था करणे, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा तसेच विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, शुक्रवार व शनिवारी राज्य अन्न आयोगाकडून नागपूर शहर व ग्रामीण भागातील विविध प्रकल्पांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात येणार आहे.

Leave a Comment

Read More