सक्षम भारत वार्ता
नागपूर, दि.४ ऑगस्ट : कलादालन आणि होप हिरोज. कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरों का कारवाँ’ या सुरेल संगीत संध्येचे आयोजन बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता. सायंटिफिक सभागृह, आठ रस्ता चौक, नागपूर येथे करण्यात आलेला आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना माधवी पांडे यांची असून, संगीतप्रेमींसाठी हिंदी गाण्यांची अविस्मरणीय मैफल सादर केली जाणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अरविंद शिंदे, आनंद गायधनी, सवितृ पोफळी आणि अनंत पारधी हे आपल्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन आनंद मास्टे यांनी केले असून, कार्यक्रमाचे संचालन नासीर खान करतील. कार्यक्रमाचे आयोजन मनीष गायकवाड, विनिता नाडेकर आणि सुनील फुडके यांनी संयुक्तपणे केले आहे. या संगीत मैफलीत विजय वासेकर, विनोद कनकदांडे, बबिता मेहर, डॉ. स्मिता रवी रामटेके, सुनील पाटील, अनीता काशीकर, संजय येरुले, मेघा जयंत झाडे, प्रांजले, मेघा करारे, अक्षय जगताप, श्रद्धा पाठक, अनुजा क्षीरसागर, योगेश मोहिते, आनंद नारेकर, माधुरी पालीवाल यांच्यासह अनेक मान्यवर कलाकार सहभाग नोंदविणार आहेत. संगीतप्रेमी नागरिकांनी या सुरेल संध्येचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











