आत्महत्या, स्त्री भ्रूणहत्या, अमली पदार्थांचा गैरवापर व पर्यावरण प्रदूषणावर होणार जनजागृती
सक्षम भारत वार्ता
नागपूर, दि. ३ सप्टेंबर : समाजात वाढत चाललेल्या विविध सामाजिक समस्यांविषयी जनजागृती निर्माण करून नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना वाढविण्याच्या उद्देशाने वहदत-ए-इस्लामी हिंद, नागपूर च्यावतीने ‘पैगाम-ए-रहमत-ए-आलम’ या अभियानातंर्गततर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवारी. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता. रवीभवन सभागृह, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे होणार असल्याचे संयोजक मोहम्मद इरशाद यांनी
वहदत-ए-इस्लामी हिंद ही धार्मिक व सामाजिक संघटना असून, देशातील विविध घटकांपर्यंत धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून सकारात्मक संदेश पोहोचविण्याचे कार्य संघटनेतर्फे केले जाते. समाजातील विविध प्रश्नांकडे केवळ समस्या म्हणून न पाहता त्यावर जनजागृती, संवाद आणि सामाजिक सहभागाच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे. चार गंभीर सामाजिक प्रश्नांवर विशेष लक्ष ‘पैगाम-ए-रहमत-ए-आलम’ अभियानाच्या माध्यमातून समाजासमोरील चार गंभीर प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये आत्महत्या प्रतिबंध व जीवनाचे महत्त्व, स्त्री भ्रूणहत्या रोखणे, अमली पदार्थांच्या गैरवापराबाबत जनजागृती आणि पर्यावरण प्रदूषण रोखणे या विषयांचा समावेश आहे.
माणसाला स्वतःच्या हातांनी मारून देऊ नका’ या संदेशातून मानवी जीवनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. कुटुंब, समाज आणि विविध सामाजिक संस्थांनी संवेदनशीलतेने पुढाकार घेतल्यास अनेक गंभीर सामाजिक समस्यांना आळा घालता येऊ शकतो, असा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे.
स्त्री भ्रूणहत्या हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून समाजाच्या भवितव्याशी संबंधित गंभीर विषय आहे. त्याचप्रमाणे अमली पदार्थांच्या वाढत्या वापरामुळे तरुण पिढीच्या आयुष्यावर होणारे परिणाम लक्षात घेऊन त्याविरोधात व्यापक जनजागृतीची आवश्यकता आहे. पर्यावरणाचे संरक्षण हीदेखील प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, प्रदूषण कमी करण्यासाठी सामाजिक सहभाग वाढविण्याचा संदेश या अभियानातून देण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती या विशेष कार्यक्रमाला संबंधित विषयांशी निगडित शासकीय व प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी, अशासकीय संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक क्षेत्रांतील प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. त्यांच्या उपस्थितीत सामाजिक समस्यांवर विचार विनिमय आणि जनजागृती करण्यात येणार आहे. समाजातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक मोहम्मद इरशाद यांनी केले आहे.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार
Views: 110

















