सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

आशा व गटप्रवर्तकांचा ६ ऑक्टोबरला गडकरींच्या निवासस्थानी मोर्चा

 शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी आंदोलन

सक्षम भारत वार्ता
नागपुर,ता.२१ : आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (CITU) नागपूर जिल्ह्याच्या वतीने गुरुदेव सेवाश्रम येथे सर्वसाधारण सभा घेण्यात आली. देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ६ ऑक्टोबर रोजी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन देण्याचा निर्णय सभेत एकमताने घेण्यात आला. आशा प्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन, आशा योजनेला स्थायी मान्यता, कामगार कायद्यात समावेश, ग्रॅज्युटी, पेन्शन तसेच EPF व ESIC चा लाभ देण्याची प्रमुख मागणी आहे. मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास १ ते ३ डिसेंबर दरम्यान देशव्यापी महापडाव व संसद घेराव करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष कॉ. राजेंद्र साठे यांनी दिला. यावेळी जिल्हा महासचिव कॉ. प्रीती मेश्राम यांच्यासह शेकडो आशा वर्कर उपस्थित होत्या. कार्यक्रमात डॉ. चंद्रशेखर बंदे यांनी कॅन्सर विषयी मार्गदर्शन केले तसेच आशा वर्करची मोफत कॅन्सर तपासणी करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला उपस्थित रंजना पवनीकर, मंदा गंधारे, सरिता ठवरे, मनीषा रामटेके, सोनू सोनवणे, उज्वला कांबळे, प्रतिमा डोंगरे, भारती वानखेडे सह शेकडो आशा वर्कर उपस्थित होत्या.

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More