सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

Women’s Equipped Bench Press Championship 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व; ४० लिफ्टर्सच्या स्पर्धेत सुवर्णपदक

Women’s Equipped Bench Press Championship 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व; ४० लिफ्टर्सच्या स्पर्धेत सुवर्णपदक

सक्षम भारत वार्ता
नागपूर,ता २३  : नागपूरच्या पॉवरलिफ्टर रोहिणी रामटेकेंनी तुर्कियेतील इस्तंबूल येथे झालेल्या Women’s Equipped Bench Press Championship 2026 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. विविध देशांतील सुमारे ४० लिफ्टर्स सहभागी असलेल्या या स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत देशाचा तिरंगा अभिमानाने फडकावला. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत गेल्या तीन वर्षांपासून त्या नियमित पॉवरलिफ्टिंगचा सराव करीत आहेत. नागपुरातील G99 Gym ॲन्ड स्पोर्ट ॲकडमी तसेच पुणे येथे त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षक ज्योती भादेकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. रोहिणी यांनी आपल्या यशाचे श्रेय आई पुष्पमाला पाटील, पती सुहास रामटेकें व मुलगा चैतन्य रामटेकेंच्या पाठिंब्याला दिले. तसेच प्रशिक्षक ज्योती भादेकर, आर्यन म्हस्के, गिरीश बिंजाडे आणि संपूर्ण टीमचे आभार मानले. या आंतरराष्ट्रीय यशासाठी Good Earth AgroChem Pvt. Ltd. (GoodEarth Group) यांच्या Sports CSR Programme अंतर्गत मिळालेल्या प्रायोजकत्वाचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले. कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरी आणि क्रीडा यांचा समतोल साधत मिळविलेले रोहिणी यांचे हे यश नागपूरसह महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरले आहे

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More