सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता.२९ : टी एम अकॅडमी अँड ब्युटी प्लेस च्यावतीने आयोजित ‘ग्रँड कराओके सिंगिंग कॉम्पिटिशन – सीझन ९’ मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला. या स्पर्धेत शहरातील अनेक गुणी गायक- गायिकांनी सहभाग घेत आपल्या उत्कृष्ट गायनाने उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन व यशस्वी आयोजन तेजश्री उपाध्याय यांनी केले. उदयोन्मुख गायक- गायिकांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे उपस्थित मान्यवर, परीक्षक, स्पर्धक व रसिकांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाला सेलिब्रिटी अतिथी प्राची वैद्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच डॉ.अनिल धकाते, डॉ. माधुरी शिंदे, डॉ. रश्मी तिरपुडे, डॉ. स्नेहल दाते आणि ज्योती मेश्राम यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून स्पर्धकांचे मनोबल वाढविले व आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून जगदीश दळवी आणि प्रीती मिरासे यांनी निष्पक्ष व व्यावसायिक पद्धतीने स्पर्धकांच्या सादरीकरणाचे परीक्षण केले. स्पर्धकांनी आपल्या सुरेल आवाज, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि रंगमंचावरील प्रभावी उपस्थितीने सर्वांची वाहवा मिळवली. यावेळी आयोजिका तेजश्री उपाध्याय यांनी सर्व मान्यवर, परीक्षक, स्पर्धक, प्रायोजक व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. भविष्यातही नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अशाच दर्जेदार संगीत स्पर्धांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.












