सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

लाठी काठी व आत्म रक्षन ग्रीष्मकालीन शिबिराचा समारोप सोहळा संपन्न

सक्षम भारत वार्ता
नागपूर.ता,१८ : ३ ऑगस्ट २०२२ रोजी सुरू झालेल्या मेघा स्टार स्पोर्ट असोसिएशन अंतर्गत गेल्या ३ वर्षा पासून ग्रीष्मकालीन शिबिरे घेतली जातात त्याच प्रमाणे या वर्षी देखील शिवकालीन शस्त्र विद्या ” लाठी काठी व आत्म रक्षन” ग्रीष्मकालीन (उन्हाळी) शिबिर मेघा स्टार स्पोर्ट असोसिएशन डायरेक्ट व झाशीची राणी मर्दानी आखाड्याचे संस्थापक मा.श्री. अंकुशजी रा. डाखोरे यांच्या मार्गदर्शना खाली ‘झाशी ची राणी मर्दानी आखाड्या’ तर्फे या शिबिराचे आयोजन उदयनगर गार्डन, एमएसईबी गार्डन येथे करण्यात आले होते त्या मध्ये प्रशिक्षक कु. योगिता भुते यांचे सुद्धा योगदान होते.शिवकालीन शस्त्र विद्या ” लाठी काठी व आत्मरक्षण ” ग्रीष्मकालीन (उन्हाळी) शिबिर हे १ जून २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधी मध्ये आयोजित करण्यात आले होते. शिबिर च्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १५ जून २०२६ रोजी या शिबिराचा समारोप सोहळा मा.श्री अंकुशजी डाखोरे यांच्या मार्गदर्शना खाली अगदी आनंदाने व उत्साहाने पार पडला. यात वेगवेगळ्या क्षेत्रातील समाज सेवेत कार्यरत असणारे मेघा स्टार स्पोर्ट असोसिएशन चे व झाशीची राणी मर्दानी आखाडा चे संस्थापक व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे विदर्भ अध्यक्ष अंकुशजी डाखोरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली होती तसेच, जनाई महिला जनकल्याण संस्थेच्या अध्यक्ष व भाजपा च्या मंत्री पदावर कार्यरत योगिता सुरकार व राष्ट्र निर्माण संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष स्टार भारत न्यूज १९ च्या क्राईम रिपोर्टर व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई च्या नागपूर जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी या सर्वांची कार्यक्रमा दरम्यान यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभलेली होती. या संपूर्ण शिबिराचा मुलांनी देखील आनंदाने सहभाग घेतला व घेतल्या जाणाऱ्या वेगवेळ्या उपक्रमामध्ये देखील सक्रियपने सहभाग करत उन्हाळी शिबिराचा आनंद घेतला.

Leave a Comment

Read More