सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत छेडखानी

सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता. २१: मोमीनपुरा भागात मनपाच्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत समाजकंटकांकडून वारंवार छेडखानी आणि अभद्र व्यवहार केला जात आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची सूचना पोलिस दलाला देण्यासोबतच – प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश संबंधित विभागाला दिल्याची – माहिती महापौर नीता ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महापौरांनी न मोमीनपुऱ्यात र स्वच्छता सांगितले की, कार्यरत महिला कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तणुकीच्या घटना घडत आहेत. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या असामाजिक तत्त्वांवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोचनि निवेदनाद्वारे केली आहे.भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित विभागाला योग्य निर्देश देण्यात यावेत आणि दोषींवर कारवाई व्हावी, असेही निवेदनात नमूद आहे. निवेदनाची दखल घेत प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश दिल्याची माहितीमहापौरांनी दिली.शहरातील अरुंद रस्ते व गल्ल्यांत स्वच्छतेसाठी महिलांऐवजी पुरुष स्व स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येईल काय, यावरसुद्धा अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही महापौरांनी यावेळी दिली.

गेल्या १५ दिवसांत काही महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत घडलेल्या

महापौर निता ठाकरे

गैरप्रकारांची गंभीर दखल घेत चौकशीचे निर्देश दिले आहेत. महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही मनपाची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी पाणी, प्रसाधनगृह, सावलीसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.”.  नीता ठाकरे, महापौर.

Leave a Comment

Read More