सक्षम भारत वार्ता
बहादुरा : शिवसेना (शिंदे गट) युवासेना चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अभय राऊत व सर्व युवासेनानी यांच्या वतीने बहादुरा परिसरात भव्य दही हांडी चे आयोजन करण्यात आले. ज्यात मराठी सिने तारका सोनाली कुलकर्णी ची उपस्थिती विशेष आकर्षण ठरत तिला पाहण्यास लोकांची अफाट गर्दी जमली. सोनाली नि लोकांशी थेट संवाद साधतांना त्याच्या आवडीच्या गीतावर नृत्य सादर केले व तिच्या नृत्यावर बालगोपाला सहित जनता थिरकली.जमलेल्या गर्दीकरिता आयोजक यांच्या वतीने सुरक्षा व सेवांचा पूर्ण बंदोबस्त करण्यात आला येणाऱ्या लोकांच्या वाहनांन करिता पार्किंग, शौचालय तसेच आपात्कालीन परिस्थिती करिता अग्निशमन ची गाळी स्थळावर उभी करण्यात आली.Dj मुक्त नागपूर या संकल्पनेला दुजोरा देत कार्यक्रम DJ लावता पारंपरिक पद्धतीचा स्वीकार केल्या गेला.अनामिका मिर्झापूरे यांच्या नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. कार्यक्रमात राधा कृष्ण स्पर्धा ठेवण्यात आली ज्यात बालगोपालांनी राधा कृष्ण वेशभूषा परिधान करून लोकांचे लक्ष वेधले उत्कृष्ट वेशभूषा परिधान केलेल्या बालगोपालांना परिषोतीश प्रदान करण्यात आले.ठेवण्यात आलेल्या ३,५१०००-/ च्या बक्षिसाकरिता रात्री ९:३० वाजेपर्यंत दही हांडी फोडण्याची कसरत चालली व शेवटी जय महाकाली, सौजरीनगर या चमूने दही हांडी फोडत पारितोषिक पटकावले. सर्व कार्यक्रम कृपाल तुमाने, विधान परिषद सदस्य.यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले असून कार्यक्रमात प्रामुख्याने राजेंद्र चिखलखुंदे,मुख्याधिकारी न प बहादुरा.हितेश यादव,अजय बोढारे, प्रीतम कापसे, शशिधर तिवारी,नगराध्यक्ष प्रतीक्षा खंदाडे,उपनगराध्यक्ष पुष्पा गायधणे . नितीन शेळके,सीमा चापेकर,किरण माहुले,दिगंबर बिसेन,अमिषा उईके,भूषण गायधने,नरेंद्र नांदूरकर,बाबा बोकडे,दुर्गा पेलने,पुष्पा खंडाईत,राधिका ढोमणे,मनीषा सतीश यादव,भोजराज घोडमारे,विनोद परिहार, विजय नाखरे,सुधा शेलोकर स्वीकृत सदस्य डॉ देवेंद्र बेलखोडे, एजाज घानिवाला यांची उपस्थिती होती सर्व कार्यक्षम व्यवस्थित पार पाडण्याकरिता अभय राऊत यांच्या सह सर्व शिवसेना युवासेनान्यांचा मोठा वाटा होता.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार















