सक्षम भारत वार्ता
बहादुरा, ता.०७ : धनश्री महिला नागरी सहकारी पतसंस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी उत्साहात पार पडली. संस्थेच्या अध्यक्षा सविता बडवाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत संस्थेच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
संस्थेचा वार्षिक अहवाल अध्यक्षा सविता बडवाईक यांनी सभेसमोर सादर करून त्याचे वाचन केले. संस्थेचे खेळते भांडवल 27,53,900 असून चालू आर्थिक वर्षातील नफा 3,23,424 तसेच संस्थेच्या एकूण सभासद 1379 संख्येसह विविध बाबींची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी संस्थेच्या वतीने सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.सभेला संस्थेच्या अध्यक्षा सविता बडवाईक, उपाध्यक्षा नूतन कोल्हे, कार्यकारी संचालक जीवन बडवाईक, संचालक डॉ. प्रतिभा टापरे, वृदा मानकर, वंदन हजारे, वानिता नासरे माया लाखे,हंसलता रेवतकर, जया लांजेवार,शोभना बालपांडे,अर्चना कावडकर तसेच यावेळी धनंजय गाडगीळ येथील तज्ज्ञांनी सभासद व उपस्थितांना मार्गदर्शन केले.संस्थेचे लेखापरीक्षण स्वाती कुलकर्णी यांनी केलं असून संस्थेला आडीट अ दर्जा आहे.
कार्यक्रमाचे संचालन जीवन बडवाईक यांनी केले, तर आभार वृदा मानकर यांनी मानले. सभेला संस्थेचे सभासद तसेच त्यांचे पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार

















