सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

नशा मुक्त व अंधश्रद्धा मुक्त पोळा साजरा

सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता .१० : लोनखैरी- नांदा येथे नशा मुक्त व अंधश्रद्धा मुक्त पोळा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नशाबंदी मंडळ व उत्कर्ष बहुद्देशीय संस्थेच्या सहकार्याने नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत नागपूर जिल्हा परिषद, समाज कल्याण अधिकारी सुखदेव कौरती यांच्या सुचनेनुसार व्यसनमुक्त व अंधश्रद्धा मुक्त पोळा वेगवेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात आला.

यावेळी आम्ही बैल असून कुठलेही व्यसन करत नाहीत आपण तर माणसं आहात.. हा संदेश दिला. सोबतच हजारो शेतकरी बांधवांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमात व्यसनमुक्ती पर गाणी व नृत्य करण्यात आले. नशा मुक्त भारत अभियानाची पोस्टर्स प्रदर्शनी व व्यसनमुक्त पुस्तिका, पत्रके, टोप्या वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लीलाधर भोयर अतिथी उपसरपंच बोधिसत्व झोडापे होते. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र अंनिस चे जिल्हा कार्याध्यक्ष तथा नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक गौरव आळणे व नशाबंदी कृती समिती तालुका अध्यक्ष तथा कोराडी शाखा अध्यक्ष ताराचंद पखिडे यांनी केले.

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More