सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

मित्र परिवार, कान्होली आयोजित भव्य तान्हा पोळा उत्सव उत्साहात संपन्न

सक्षम भारत वार्ता
कान्होली : मित्र परिवार, कान्होली यांच्या वतीने आयोजित भव्य तान्हा पोळा उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. या उत्सवात गावातील चिमुकल्या बालगोपालांनी आकर्षक वेशभूषा परिधान करून तसेच विविध प्रकारे नंदीबैल सजवून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला कार्यक्रमामध्ये सहभागी बालगोपालांना सायकल, ड्रेसिंग टेबल, ऑफिस टेबल, मिक्सर, कुकर, तसेच इतर मिळून ३० आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच सहभागी झालेल्या सर्व नंदीबैलांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावाचे उपसरपंच मिलिंद रमेश कोवे, सदस्या दिपाली वलके, दिपाली करपाते, सुनीता वलके तसेच हेमंत बगवे, पांडुरंग कोवे, प्रदीप इटणकर, सचिन वलके, सागर कुलमथे, पांडुरंग वलके, विकास करपाते, गजानन खंडारे, अरविंद उईके, रवींद्र आडे, पुरुषोत्तम सलाम, प्रकाश दडमल, राकेश मडावी, संतोष कोवे, प्रशांत करपाते, नंदू कुमरे, अरविंद कोवे, भावेश वलके, मंगल कोवे, गौरव गोंडगे,राज कळंबे, तन्मय कोवे यांच्यासह मित्र परिवार आणि गावातील सर्व महिला बचत गट यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. उपस्थित ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वर्षीही अशाच उत्साहात हा उत्सव साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला.

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More