सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

व्यवसाय व्यवस्थापन विभागात प्री-पीएचडी कोर्सवर्क  -अधिसभा सदस्य श्री. विष्णू चांगदे व ॲड. मनमोहन बाजपेयी यांच्या उपस्थितीत उद्घाटन 

सक्षम भारत वार्ता
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर व्यवसाय व्यवस्थापन विभागात प्री-पीएचडी कोर्सवर्कचे आयोजन सोमवार, दि. ७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२६ दरम्यान करण्यात आले आहे.‌ प्री-पीएचडी कोर्सवर्कचा उद्घाटन कार्यक्रम अधिसभा सदस्य श्री. विष्णू चांगदे व ॲड. मनमोहन बाजपेयी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडला.

माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाला वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेधा कानेटकर, अधिसभा सदस्य श्री. विष्णू चांगदे, ॲड. मनमोहन बाजपेयी, विभाग प्रमुख डॉ. राहुल खराबे यांची उपस्थिती होती. अधिसभा सदस्य श्री.विष्णू चांगदे यांनी पीएचडी प्रवेश पात्र विद्यार्थ्यांसाठी ६ क्रेडिटच्या प्री-पीएचडी कोर्सवर्कचे आयोजन करण्यात आल्याने या उपक्रमाचे स्वागत केले. विद्यापीठ परिक्षेत्रात विद्यार्थ्यांना अधिकाधिक संशोधनाची संधी प्राप्त व्हावी याकरिता अधिसभेत प्री-पीएचडी कोर्सवर्कचे आयोजन करण्याबाबत मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने विभागाच्या वतीने प्री-पीएचडी कोर्सवर्कचे आयोजन केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सामाजिक दायित्व लक्षात घेत समाजपयोगी संशोधन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन बाजपेयी यांनी मार्गदर्शन करताना विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती दिली. विद्यापीठाच्या सुविधेचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी सखोल संशोधन करावे असे आवाहन त्यांनी केले.

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेधा कानेटकर यांनी ६ क्रेडिटच्या प्री-पीएचडी कोर्सवर्कचे योग्य नियोजन केल्याने विभागाचे अभिनंदन केले. या कोर्सवर्कचा संशोधन कार्यात विद्यार्थ्यांना उपयोग होईल. तसेच विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक करताना विभाग प्रमुख डॉ. राहुल खराबे यांनी कोर्सवर्क आयोजन करण्याबाबत माहिती दिली. संशोधन कार्यात कोर्सवर्कचे महत्व त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून पटवून दिले. उद्घाटननीय कार्यक्रमाचे संचालन डॉ. शिल्पा सोनटक्के यांनी केले तर आभार विभाग प्रमुख डॉ. राहुल खराबे यांनी मानले. प्री-पीएचडी कोर्सवर्क दरम्यान दररोज साधारणत: चार सत्र होणार असून एकूण ४०-४५ सत्राचे आयोजन केले जाणार आहे.

 

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More