सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

योगा स्पर्धेत ‘विवेकानंद पब्लिक स्कूल’चे यश

सक्षम भारत वार्ता
बहादुरा : येथील विवेकानंद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी योगा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शाळेतील एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, ज्यापैकी तब्बल २७ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पदके पटकावली. मुलांच्या या सर्वोत्तम कामगिरीमुळे शाळेला ‘टिम ट्रॉफी’ आणि सर्वाधिक सहभागात ‘द्वितीय क्रमांक’ मिळवून गौरविण्यात आले.

स्पर्धेतून परतलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेत भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे संचालक विवेक गुलाबरावजी भोंडे, सहाय्यक संचालिका सुनैना विवेक भोंडे, सचिव वैशाली कडू , प्राचार्य वैशाली बावनकुळे , उपप्राचार्य दर्शना मार्कंडे आणि प्रशासकीय अधिकारी अमित कुथे सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी आपल्या या यशाचे श्रेय योगा कोच सुशील रहांगडाले आणि विजया विजया मेश्राम यांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More