सक्षम भारत वार्ता
बहादुरा, ता. 18 : सुरेश भट सभागृह येथे आयोजित जिल्हास्तरीय कुश्ती स्पर्धेत विवेकानंद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांची विभागस्तरीय (Division Level) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेमधे प्रथम क्रमांक भावेश हरडे (विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड) द्वितीय क्रमांक: मंथन इसापुरे,युवराज देशमुख, यशस्वी मेंढे,स्वराली भोयर,स्नेहा कारमंगे,खुशी दौने,मिथिलेश वाढई खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक सुशिल रहागंडाले व विजया मेश्राम यांचे विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले. विद्यार्थ्यांच्या या शानदार यशाबद्दल शाळेचे संचालक विवेक भोंडे, उपसंचालिका सुनैना भोंडे, सचिव वैशाली कडू, प्राचार्य वैशाली बावनकुळे व उपप्राचार्य दर्शना मार्कण्डेय यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी व आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार















