सक्षम भारत वार्ता
बहादुरा, ता.५ : हुडकेश्वर पोलीस स्टेशन क्षेत्रातील घरफोडी व वाहन चोरीचे घटना लक्षात घेता या घटनांना
आढा घालण्याकरता पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी सर्व परिसरात रात्रीच्या गस्त मुख्य रस्ता तसेच जिथून मोठे वाहन जात नाही तिथून दुचाकीद्वारे गस्त वाढवली आहे. ज्यामुळे घरफोडी तसेच वाहन जोडीला आला घालता येईल या उद्देशाने होणाऱ्या गस्तीवर ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने नियमित निगराणी असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच परिसरातील जनतेला त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना पण केल्या.
*घर बंद करून बाहेर जाताना सर्व दरवाजे व खिडक्या व्यवस्थित लॉक करा.
*घरात सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा अलार्म बसवा.
*मौल्यवान दागिने, रोख रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवा. *अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नका.
*शेजाऱ्यांना प्रवासाबाबत माहिती द्या.
*रात्रीच्या वेळी घराबाहेरील परिसरात पुरेसा प्रकाश ठेवा.
*संशयित व्यक्तीं किंवा हालचाली आदळल्यास तात्काळ पोलिसांना कळवा.
*सोशल मीडियावर प्रवासाची माहिती सार्वजनिक करू नका.
*वाहन नेहमी सुरक्षित व प्रकाशयुक्त ठिकाणी पार्क करा.
*दुचाकी व चारचाकी वाहन लॉक करूनच सोडा.
*अतिरिक्त व्हील लॉक, डिस्क लॉक किंवा स्टीयरिंग लॉकचा वापर करा.
*वाहनात मौल्यवान वस्तू उघडयावर ठेवू नका.
*वाहनाची कागदपत्रे वाहनात ठेवू नका.
*पार्किंग परिसरात सीसीटीव्हीची व्यवस्था असावी.
*अनोळखी व्यक्तींना वाहनाची चावी देऊ नका.
*संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा.
*वाहनामध्ये GPS Tracker बसविण्यास प्राधान्य द्या.
*वाहन चोरी झाल्यास त्वरित 112 किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा.
अशा महत्त्वाच्या सूचना हुडकेश्वर पोलीस स्टेशन च्या पोलिस निरीक्षक अनामिका मिर्झापूरे यांनी नागरिकांना दिल्या.












